मालवण तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा ५ मार्च रोजी स्नेहमेळावा

Google search engine
Google search engine

चौके | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक,पदवीधर,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,विस्तार अधिकारी यांचा संयुक्तिक स्नेह मेळावा मालवण तालुकाअध्यक्ष श्री विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दि.०५ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आपले कलागुण प्रदर्शित करणार आहेत तसेच कणकवली येथील संगीत विशारद श्री माधव गांवकर यांचा संगीत मैफिलीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांना डाँ.श्री किरण गोसावी हे आरोग्य विषयक मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्याला प्रमुख मान्यवर म्हणून मा.श्री आप्पासाहेब गुजर-गटविकास अधिकारी मालवण,श्री संजय माने- गटशिक्षणाधिकारी मालवण,श्री सावळाराम अणावकर जिल्हाध्यक्ष,श्री सुंदर पारकर- जिल्हा सरचिटणीस यांच्याबरोबर जिल्हा अशोसिएशन पदाधिकारी.सर्व तालुकाध्यक्ष.कार्यकरणी सदस्य स्नेहमेळाव्याला उपस्थित राहून शुभेच्छा देणार आहेत.तरी मालवण तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक,पदवीधर,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,विस्तार अधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीमती रुपाली पेंडुरकर,सरचिटणिस सुरेश चव्हाण ,ज्ञानदेव ढोलम,श्यामसुंदर माळवदे आनद धुत्रे यांनी केले आहे.