कोकणातील शेतकरी यावेळी वेगळयाच चिंतेत आहे. कोकणातील आंबा, काजू, कोकम बागायतदार शेतकऱ्यांना काय करावं हेच सूचत नाही अशी स्थिती आहे. यावेळी बिघडलेल्या हवामान स्थितीतही चांगल आंबा, काजू पिक येईल असा बागायतदार शेतकऱ्यांचा अंदाज होता. परंतु थ्रिप्स नावाच्या किटकाने बागायतदार शेतकऱ्यांची झोपच उडवली आहे. किटकनाशक फवारणी केल्यावर हा किटक नाहिसा होईल असं बागायतदार शेतकऱ्यांचा होरा होता. परंतु किटकनाशक फवारणीचा कोणताही परिणाम आंबा, काजू बागायतीत दिसत नाही. यामुळे पुढे काय होणार याची नुसती कल्पना करूनच बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी अवकाळी पाऊस पडल्यानंतर जी थंडी आली त्यांने आंबा, काजू, बागायतीत चांगला मोहरही आलेला. कणी तयार झाली. छोटी-छोटी फळ तयार झाल्यानंतर थ्रिप्सने जो अॅटॅक केला त्यात बागेतील आंबा, काजू फळ झाडावरच कोमेजली. कोकणातील यासंदर्भाने काही बागायतदारांशी बोलल्यावर या थ्रिप्सच संकट किती मोठे आहे हे समजून आलं. देवगडातील आंबा बागायतदार प्रकाश गोगटे म्हणाले, आंबा, काजू पुरता मर्यादेत या थ्रिप्सचा अॅटॅक नाही तर त्याचा परिणाम फुलझाडांवरही दिसू लागला आहे. जास्वंदीच्या फुलांवरही याचा परिणाम झाला आहे. केवळ विशिष्ट फळावर, फुलांवर थ्रिप्सचा परिणाम आहे असे नाही तर तो सर्वत्रच परिणाम करत आहे. आजवर किटकनाशकाच्या फवारणीने त्याच अतिक्रमण रोखल जात होतं. परंतु यावेळी कोणत्याही किटकनाशकाचा परिणाम होताना दिसत नाही. ही तर खरी खरंतर चिंतेची बाब आहे. यामुळेच देवगड-कणकवली-वैभववाडीचे आ. नितेश राणे यांनी आंबा, काजू बागायतदारांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली. कोकणकृषी विद्यापिठातील संशोधकांशी संपर्क साधून यावरचे उपाय कोणते करायचे याच बागायतदार शेतकऱ्यांना आवश्यक आणि योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आ.नितेश राणे यांनी केल्या आहेत. यावेळी काजू पिकाच्या बाबतीतही एक विचित्रपणा घडत आहे. काजू बागायतीत एक वर्षाआड काजू पिक येत नाही. तर दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात बागायतीत काजू पिक होत असत. परंतु काजू बागायतदारांच्या म्हणण्यानुसार यावर्षी काजू बागायतीतील काही झाडांवर काजू आलाय तर बाजूच्याच काही झाडांवर एकही काजू नाही. यापूर्वी असं कधी होत नव्हत असं काजू बागायतदारांच म्हणण आहे. हे असं का व्हायला लागल असा प्रश्नही काजू बागायतदार शेतकऱ्यांना सतावू लागलाय. एवढ सारं संकट कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांसमोर असतानाही कोकणातील शेतकरी शेतकऱ्यांसमोर रडत न बसता आपले प्रयत्न बागायतदार शेतकऱ्यांने सोडलेले नाहीत तर तो सतत प्रयत्नशिल असतो. आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार एप्रिल-मे च्या हंगामात या थ्रिप्सच्या अॅटॅकने आंबा पिकच येणार नाही. मे महिन्यात येणारे आंबा पिक हे आंबा बागायतदार शेतकऱ्याला अधिकचे चारपैसे मिळून देते. परंतु आजच्या स्थितीनुसार एप्रिल-मे मध्ये आंबा हंगाम असेल की नाही हेच ठरवणे अवघड आहे. जानेवारी-फेब्रुवारी मध्ये जो आंबा मार्केटमध्ये येतो त्याचे अधिकचे पैसे आले असं वाटलं तरीही त्यात शेतकऱ्यांचा काही फायदा नसतो. कारण आंबा पिक मार्केटमध्ये यायला लागल तरीही विक्री व्यवस्था तितकीच अधिक असायला पाहिजे. मे मध्ये कॅनिंग फॅक्टरीलाही आंबा खरेदी केला जातो. त्यामुळे आंबा पडून राहाणार नाही. कमी-अधिक दराने आंबा जाऊ शकतो ही विश्वासाची भावना बागायतदार शेतकऱ्यांमध्ये असते. या थ्रिप्सवर डेअरीश नावाच किटकनाशक उपयोगी व्हायच आतातर त्याचा काही परिणामही जाणवत नाही. हा सारा आंबा, काजू बागायतदारांसाठी चिंतेचाच विषय आहे. आंबा, काजू, कोकम या फळ पिकांवर त्याचा जो परिणाम होत आहे त्यामुळे यावर्षी बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आंबा, काजू बागायतीत केलेला खर्चही बाहेर येणे अवघड आहे. यामुळे बागायतदार शेतकऱ्यांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. थ्रिप्स हा सूक्ष्म किटक आहे. परंतु थ्रिप्स फळातील रस शोषून घेत असल्याने आंबा, काजू फळ सुकल्यासारखी दिसतात. त्यामुळे थ्रिप्सच्या अॅटॅकने कोकणातील कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांपुढे यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. बागायती शेतीत अगोदरच माकड, गवारेडा यांचा हैदोस आहेच. त्यातच थ्रिप्सच्या अॅटॅकची आणखी भर पडली आहे. निसर्गाने एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले असेच म्हणण्यासारखी स्थिती आहे.












