लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या सी.एस.सी केंद्राचे उद्घाटन संपन्न

आमदार राजन साळवी यांच्या हस्ते हीच कापून झाले उद्घाटन

 लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सीएससीअर्थात काॅमन सर्व्हिस सेंटर चे उद्घाटन आज गुरुवारी १५ फेब्रुवारी सकाळी १०.३० वाजता आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

तालुक्यातील शेतकऱ्यांसह गोरगरीब जनतेला आधार कार्ड सह अन्य सर्वच ऑनलाइन सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लांजा तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने सीएससी सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज आमदार राजन साळवी यांच्या हस्ते फीत कापून तर जिल्हा बँकेचे संचालक अजित यशवंतराव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यानंतर संघाच्या सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर आमदार राजन साळवी यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अजित यशवंतराव, महेश खामकर तसेच संघाचे चेअरमन परवेश घारे, व्हाईस चेअरमन शेखर तेंडुलकर, त्याचप्रमाणे प्रथमेश मेस्त्री, बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर गवाणकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला

यावेळी बोलताना आमदार राजन साळवी, अजित यशवंतराव, महेश खामकर यांनी सांगितले की संघाची अशी उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि संघाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम सुरू करावेत .जेणेकरून संघाचे नाव जिल्हाभरात, राज्यस्तरावर पोहोचेल याप्रमाणे त्यांनी काम करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला तालुका खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक, चंद्रकांत शिंदे संचालक सुरेश विठोबा साळवी, , केशव कुपटे, महादेव खानाविलकर , मोहन घडशी , संदीप दळवी, सुभाष पवार, सुभाष लाखण, उमेश तोडणकर,राहुल शिंदे , सायली मोहन तोडकरी ,धनिता विजय चव्हाण, तेजस्वीनी शेट्ये,संतोष बेनकर उपस्थित होते. तसेच.तालुक्यातील विविध सोसायटीचे चेअरमन ,सचिव आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.