खेड नजीक मडगाव नागपुर एक्सप्रेस मधून मोबाईल चोरीस

खेड(प्रतिनिधी) : येथील रेल्वे स्थानकावर उभी असलेल्या मडगाव नागपुर एक्सप्रेस गाडी मधून एका प्रवाशाचा १८ हजार रुपये किंमती चा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या प्रकरणी येथिल पोलीस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वा च्या सुमारास घडली.
या प्रकरणी सूर्यांश राजेश शाहु, वय- १८, रा. जुनी शुक्रवारी, सक्करदरा रोड, हनुमान नगर मंदिराजवळ, रघुकूल बिल्डिंग नागपुर यांनी येथिल पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
 फिर्यादी हे ट्रेन नंबर ०११४० मडगाव ते नागपुर एक्सप्रेसचे प्रवास करीत असताना, खेड रेल्वे स्टेशन येथे गाडी उभी असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचा झोपेचा फायदा घेवून १८हजार रुपये किंमतीचा रेडमी नोट १० लाई. ग्रीन कलरचा मोबाईल चोरून नेला.