सभेची तयारी अंतिम टप्प्यात;आम जाधवांवर साधणार निशाणा
गुहागर | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते निलेश राणे यांचा उद्या शुक्रवारी गुहागर दौरा असून पाटपन्हाळे हायस्कूलच्या मैदानावर त्यांची जंगी सभा होणार आहे.या सभेची गुहागर भाजपकडून जोरदार तयारी सुरु असून ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

गुहागर भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरुवारी सकाळी गुहागर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी या सभेला सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून पदाधिकारी देखील मोठ्या उत्साहात जोरदार कामाला लागले आहेत.तसेच विविध ठिकाणी या सभेचे बॅनर लागले असून सभेस्थळी देखील जोरदार तयारी सुरू आहे.एकूणच आज होणाऱ्या सभेची वातावरण निर्मिती पूर्ण झाली आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेला या सभेतून निलेश राणे जोरदार प्रत्युत्तर देणार आहेत.त्यामुळे उद्याची ही सभा वादळी ठरणार एवढे निश्चित आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आक्रमक ओळखले जाणारे नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांची जंगी सभा गुहागर मतदारसंघात आयोजित करण्यात आल्याने गुहागर भाजपामध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.












