तोरसोळे येथे १८ व १९ फेब्रवारी रोजी शिवजन्मोत्सव व संस्थेचा दशकपूर्ती सोहळा 

शिवस्नेही या सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजन 

शिरगाव (वार्ताहर)   देवगड तालुक्यातील तोरसोळे येथील शिवस्नेही या सामाजिक संस्थेच्या वतीने १८ व १९ फेब्रुवारी रोजी तोरसोळे येथील शिवस्मारक येथे शिवजन्मोत्सव व संस्थेचा दशकपूर्ती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार १८ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ७.३०वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य पालखी मिरवणूक, राञी ८.३० वाजता समई नृत्य,रात्री ९.३० वाजता तोरसोळे गाव मर्यादित नृत्य व गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सोमवार १९ फेब्रुवारीला

सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन,सकाळी ९ वाजता गणेश पूजन,सकाळी १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती, दुपारी १ ते ३ वेळेत महाप्रसाद,दुपारी २.३० वाजता हळदीकुंकू समारंभ,दुपारी ३.३० वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम, सायंकाळी ४.३० वाजता मुलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा, सायंकाळी ५ ते ८ वेळेत स्थानिक भजने, रात्री ८.३० वाजता शैक्षणिक व क्रिडा श्रेञातील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, राञी ९ वाजता नृत्य व गायन स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ,राञी ९.३० वाजता बुवा विनोद चव्हाण आणि बुवा प्रवीण सुतार यांचा आमने सामने २०×२० डबलबारी भजनाचा सामना होणार आहे.

सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे शिवस्नेही संस्थेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.