लांजा( प्रतिनिधी) रत्नागिरी तालुक्यातील श्री मंगलमूर्ती माघी गणेशोत्सव केळ्ये आंबेकोंडवाडी यांच्या वतीने आयोजित जिल्हा स्तरीय राम -रावण युध्द स्पर्धेत लांजा तालुक्यातील देवधे येथील नवलाई देवी नमन मंडळ हरमलेवाडीने प्रथम क्रमांक पटकावला.
माघी गणेशोत्सवा निमित्ताने ही जिल्हास्तरीय राम -रावण युध्द स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत नवलाई देवी नमन मंडळ हरमले वाडी या मंडळाने जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांक पटकावला.
यामध्ये राम – विजय हरमले, रावण- राजेंद्र हरमले, शाहीर – विश्वनाथ हरमले, म्रृंदुंग वादक- विराज हरमले, म्रृंदुंग वादक- सावजी हरमले, टाळ वादक – सखाराम हरमले, कोरस व झांज वादक – सचिन हरमले, ढोल वादक – अभिजित गुरव, ढोल वादक – अजय टाकळे, ताशा वादक – यश टाकळे तसेच या मंडळाचे सदस्य विशाल हरमले, विनय हरमले, प्रितम हरमले, प्रदिप पाडावे उपस्थित होते.












