गुहागर :
आजची सभा उधळून लावण्यासाठी भास्कर जाधव चिपळूणला कर्यकर्त्यांच्या मागे उभा होता. घोषणा देत होता, आमच्या गाडीवर दगडफेक झाली, त्यावेळी निलेश राणे स्वतः त्यांच्या गाडीतून उतरले, कार्यकर्त्यांच्या पुढे येऊन उभे राहिले, त्यावेळी जाधवच्या कार्यकर्त्यांना निलेश राणे म्हणजे काय हे समजलं. आजची ही सभा उत्स्फूर्त आहे. म्हणूनच भास्कर जाधवने समजून जावं नुसत्या नकला करून जनतेची सेवा होतं नाही. आम्ही राणे कुटुंबियांवर प्रेम करणारे मनसे आहोत, त्यामुळे यापुढे असं वागू नका असा इशारा भाजपा नेते संदीप कुडतरकर यांनी दिला आहे.












