उद्योजक निलेश चव्हाण यांचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून आभार
गुहागर/प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ स्काँन प्रो आणि स्काँन प्रो फाऊंडेशन वारजे, पुणे यांच्यावतीने गुहागर
तालुका आरोग्य कार्यालयाला १०० खुर्च्या देणगीस्वरुपात भेट देण्यात
आल्या. यावेळी फाऊंडेशनचे प्रतिनिधी मुणगेकर व प्रकाश यांचा शाल व श्रीफळ
देऊन तालुका आरोग्य अधिकारी डाँ. घनश्याम जांगीड यांच्याहस्ते सन्मान
करण्यात आला.
गुहागर तालुका आरोग्य विभागाचे नवीन कार्यालय बांधण्यात आले. या नव्या
इमारतीच्या सभागृहात आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्या निरंतर सभा,
कार्यशाळा व प्रशिक्षण घेण्यात येते. त्यामुळे सभागृहात बसण्यासाठी
खुर्च्या नसल्याने ही बाब तालुका आरोग्य अधिकारी डाँ. जांगीड यांनी
स्काँन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्याकडे खुर्च्यांची
मागणी केली होती. त्यानुसार, कार्यालयाला १०० खुर्च्या देणगीस्वरुपात भेट
देण्यात आल्या.
यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी दिलीप जाधव, आरोग्य सहाय्यक रमेश भालेकर,
लेखापाल, सचिन चौगुले, आशा समन्वयक श्रीम. श्रध्दा पवार आदी उपस्थित
होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी जांगीड यांनी स्काँन फाऊंडेशनचे व
उद्योजक निलेश चव्हाण यांचे आभार मानले.











