पाळेकरवाडी ग्रामपंचायतीवर भाजपाचा सरपंच विराजमान

देवगड तालुक्यातील पाळेकर वाडी ग्रामपंचायत मध्ये सत्तापालट झाला असून आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून उदय पाळेकर यांची निवड झाली आहे.

पाळेकर वाडी ग्रामपंचायत मध्ये यापूर्वी भाजपाचे तीन सदस्य होते मात्र शिवसेनेच्या एका सदस्याने पाठिंबा दिल्यामुळे भाजपाची सदस्य संख्या चार झाली असून शिवसेनेची सदस्य संख्या तीन राहिली आहे यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदावर उदय पाळेकर यांचा विजय झाला आहे

नितेश राणे यांना अभिप्रेत असलेला विकास त्यांच्या नेतृत्वाखाली आपण गावात करून दाखवा तालुक्यामध्ये आदर्श गाव म्हणून पाळेकर वाडीचा नक्की नावलौकिक करू असे मत उदय पाळेकर यांनी व्यक्त केले आहे.

या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जगताप यांनी काम पाहिले