काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ पदाधिकारी सदानंद गांगण यांचा पक्षाला घरचा आहेर
संतोष कोत्रे l लांजा :- जे स्वतःला जिल्हा काँग्रेसचे नेते समजतात त्यांच्यामुळेच आज रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाली आहे, अशा शब्दात रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आणि जेष्ठ पदाधिकारी ॲड सदानंद गांगण यांनी जिल्हा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.
पत्रकारांशी बोलताना ॲड सदानंद गांगण हे म्हणाले की, आज रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट आहे .याला कारण हे जिल्ह्याचे स्वतःला नेते समजणारे आहेत. त्यांच्यामुळेच ही अवस्था झाली आहे. आजवर ज्यांनी मंत्रीपदे भोगली, आमदारकी खासदारकी भोगली परंतु सर्वसामान्य जनतेकडे त्यांनी कधीही लक्ष दिले नाही. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडे लक्ष दिले नाही. कधी पक्षाचा मेळावा घेतला नाही तर कधी काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेतले नाही. आणि म्हणूनच आज ही अवस्था काँग्रेसची इतकी बिकट अवस्था झाली आहे.
मुंबईत बसून पक्षाचे काम करता येत नाही असा देखील टोला सदानंद गांगण यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लगावला आहे. आज काँग्रेस पक्षाची जी बिकट अवस्था झाली आहे त्याबद्दल पक्षश्रेष्ठींच्या कानावर अनेक वेळा ही बाब घातलेली आहे मात्र त्यानंतर जनी लक्ष गांभीर लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज परिस्थिती पाहिली तर पालघर जिल्ह्यापासून ते सिंधुदुर्ग जिल्हा पर्यंत काँग्रेस पक्षाचा एकही आमदार खासदार नाही ही परिस्थिती कुणामुळे झाली? असा सवाल ॲड सदानंद गांगण यांनी उपस्थित केला. काँग्रेसचे जुने जाणते सर्वसामान्य कार्यकर्ते आजही पक्षासोबत आहेत. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा होऊ द्यायचे नाही कारण तो मोठे झाला तर आपल्याला कोण विचारणार ही भूमिका काहींची असल्याने पक्ष संपला तरी चालेल पण आपण टिकलो पाहिजे. त्यामुळे ते पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत नाहीत आणि यामुळेच आज ही काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे.
याची पक्षश्रेष्ठीनी गांभीर्याने दखल घेऊन आगामी काळात काँग्रेस पक्ष संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात वाढला पाहिजे यासाठी येथीलच स्थानिक कार्यकर्त्यावर जे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे,पक्ष वाढवण्यासाठी सचोटीने काम करतील अशाच कार्यकर्त्यावर नेतृत्वाने जबाबदारी द्यावी असे देखील गांगण यांनी म्हटले.











