शीळ ग्रामपंचायत सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध… पहा कोण झाले सरपंच…

Google search engine
Google search engine

राजापूर | प्रतिनिधी : शहरानजीकच्या शीळ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंचपदासाठी आज झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये अशोक पेडणेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे श्री. पेडणेकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
शहरानजीकच्या शीळ ग्रामपंचायतीचे सात सदस्य संख्या असून वैयक्तिक कारणास्तव यापूवीचे सरपंच नामदेव गोंडाळ यांनी वर्षभरापूर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सरपंचपद रिक्त राहीलेले होते. या सरपंचपदासाठी आज निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसिलदार राकेश गिड्डे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही निवडणूक पार पडली. या निवडणूकीसाठी निर्धारीत कालावधीमध्ये श्री. पेडणेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. छाननीमध्ये तो वैधही ठरला. श्री. पेडणेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. सरपंचपदी निवड झाल्याबद्दल श्री. पेडणेकर यांचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गिड्डे, तलाठी संदीप कोकरे, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य नामदेव गोंडाळ, अंकीता बाईत, रोहीणी गोंडाळ, अश्‍विनी नागरेकर, ग्रामसेवक श्री. डिगुळे यांच्यासह माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाळ गोंडाळ, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गोंडाळ, प्रशांत नागरेकर आदींनी अभिनंदन केले. सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री. पेडणेकर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.