नवीन जलवाहिनीसाठी २८ लाखांचा निधी, आमदार योगेश कदम यांच्याहस्ते शुभारंभ
खेड (प्रतिनिधी) खेड शहरातील शिवतररोड परिसरात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी २८ लाख ३५ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे येथील रहीवाशांना सतावणारी पाण्याची समस्या कायमची निकाली निघणार आहे. आमदार योगेश कदम यांच्या हस्ते जलवाहीनीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
शिवतररोड परिसरातील रहिवाशांना वर्षानुवर्षे कमी दाबाच्या पाणी समस्येला तोंड द्यावा लागत होते. प्रसंगी विकतच्या पाण्यावर तहान शमवावी लागत होती. याबाबत नगरप्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून, हंडामोर्चा काढूनही प्रश्न जैसे थे होता
पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्या माजी नगरसेवक सतिश चिकणे आमदार योगेश कदम यांच सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर यश आले आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी २८ लाख ३५ हजार रूपयांचा निधी मंजूर असून प्रत्यक्षात कामास देखील सुरुवात झाली आहे.
यावेळी ग. रा. चिकणे, माजी जि परिषद सदस्य अरूण कदम शहरप्रमुख कुंदन सातपुते, माजी नगरसेवक सतिश चिकणे, विद देवळेकर, कल्पेश बेंडखळे, माजी नगरसेवक मिनार चिखले खेडेकर, वैभव खेडेकर, शय कांगणे, सासणे, कासारे, काळे, मिल जाधव, समीर घाडगे उपस्थित होते











