महिला शहर आघाडीचे अध्यक्षपदी संपदा कुरूप यांची झाली निवड
लांजा (प्रतिनिधी) शहर आणि तालुक्यातील भाजपाच्या ज्या कार्यकर्त्यांच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून निवड झाली आहे त्यांच्या नियुक्तीपत्र आणि शिक्का वाटप कार्यक्रम आज रविवारी १८ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता शहरातील भाजपा कार्यालयात पार पडला.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर भाजपाच्या राजापूर लांजा विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव, लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, महिला तालुकाध्यक्ष परिणीती सावंत, तसेच महिला शहर अध्यक्ष संपदा कुरूप, जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षपदी संपदा संतोष कुरूप यांची निवड करण्यात आली. महिला तालुकाध्यक्षा परिणीती सावंत आणि नेत्या उल्का विश्वासराव यांच्या हस्ते या नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यानंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून ज्यांची निवड झाली आहे त्या १८ जणांपैकी १५ जणांना नियुक्तीपत्र आणि शिक्का वाटप करण्यात आले .यामध्ये मुग्धा मनोज चांदोरकर, गुरुप्रसाद तेली, आनंद शिगम, गिरीश कुरतडकर ,संपदा कुरूप, नितीन लिंगायत, ऋषिकेश कोलते, प्रिया हरमले, मिलिंद आठल्ये,
मनस्वी महेश खामकर ,सुदेश जंगम, समीरा संतोष सुर्वे, सौ साक्षी संतोष पराडकर ,काजल संतोष पानगले, मिलिंद वाघदरे या १५ जणांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला नगरसेवक संजय यादव, तसेच मंगेश लांजेकर , जिल्हा निमंत्रित सदस्य विजय कुरूप, तालुका सरचिटणीस विराज हरमले, युवा अध्यक्ष अजय गुरव, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, आदींसह अन्य पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











