निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडणगड पोलिसांचा शहरासह ग्रामीण भागात रूट मार्च

 

मंडणगड : प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेच्या अमलबजावणीकरिता याचबरोबर दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनखाली मंडणगड पोलीस स्थानकाच्या वतीने 1 नोव्हेंबर २०२४ रोजी रूट मार्च घेण्यात आला. यावेळी मंडणगड शहर, म्हाप्रळ, कुंबळे, पंदेरी याठिकाणी रुट मार्च घेण्यात आला. या रूट मार्च मध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान व मंडणगड पोलीस स्थानकाचे सर्व कर्मचारी सहभागी होते.