खेडमधील रोटरी स्कूलचे करणार रंगकाम
खेड (प्रतिनिधी) रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुशोभीकरणासाठी कन्साई नेरोलॅक पेंट्सच्या सी. एस. आर. फंडातून आर्थिक सहाय्य देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कन्साई नेरोलॅक कंपनीचे एच. आर चीफ मॅनेजर व सी. एस. आर. अॅडमीन हेड संतोष देशमुख, कन्साई नेरोलॅक लोटे ब्रांच एच आर हेड नंदन सुर्वे, सुयोग इन्फ्रास्पेसेस कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीराम जोशी, सी. एस. आर. डिपार्टमेंटमध्ये कार्यरत पदाधिकारी सुनील मोरे, प्रकाश आंब्रे, रोटरी स्कूलच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी चिखले, विश्वास सोमण, निरंजन दळी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल आदी उपस्थित होते.
नेरोलॅक पेंट्स लोटे ब्रांच या कंपनीमार्फत परिसरातील शाळांचा शैक्षणिक विकास करण्याच्या दृष्टीने कंपनीच्या सी. एस. आर. फंडांतर्गत मदत दिली जाते. याच पाश्र्वभूमीवर कंपनीमार्फत रोटरी शाळेच्या संपूर्ण इमारतीच्या रंगकामासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. या मिळालेल्या देणगीच्या माध्यमातून संपूर्ण रोटरी स्कूलच्या इमारतींचे रंगकाम करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख मान्यवर कन्साई नेरोलॅक कंपनी संतोष देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आपली नेरोलॅक पेंट्स लोटे बंच कंपनी व्यावसायिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहे, असे सांगून रोटरी स्कूलच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










