पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे २६ रोजी बक्षीस वितरण

 

खेड (प्रतिनिधी) खेड लायन्स क्लब ऑफ सिटी व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव अशा दोन गटात घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचे २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बक्षीस वितरण होणार आहे.

उत्सव काळातील सामाजिक संदेश, नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रदूषण विरहित उत्सव, पर्यावरणपूरक सजावट आदी निकष स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. सार्वजनिक गणेशोत्सव गटातील विजेत्यास २५५५ रूपये, उपविजेत्यास १५५५ रूपये, तृतीय क्रमांकास ९९९ रुपये व सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात येणार आहे. घरगुती गणेशोत्सव गटातील विजेत्यास २२२२ रूपये, उपविजेत्यास ११११ रूपये व तृतीय क्रमांकास ७७७ रूपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. बक्षीस वितरणप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक धनजंय कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार सुधीर सोनावणे, पोलीस निरीक्षक नितीन भोयर, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्यासह तालुका पत्रकार संघ व लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.