सावंतवाडी । प्रतिनिधी : समाजात आपण वावरत असताना आपणही या समाजाचं देणं लागतो हि भावना मरू नये या विचारांनी सोशल रील काँटेस्ट या स्पर्धेचे जानेवारी महिन्यात कोकण संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरातीय घेतलेल्या या स्पर्धेत राज्यातील शेकडो युवांनी सहभाग नोंदवला होता. स्वतः सामाजिक बदल घडवतांना किंवा सामाजिक कार्य करतानाचे रिल्स बनवून यात सहभाग घ्याचा होता. आजची युवा पिढी सामाजिक भान विसरून सोशल मीडियाचा दुरुपयोग करताना दिसतात आणि याच सोशल मीडियाचा वापर करून आपण समाजात बदल घडवण्यासाठी काही प्रयत्न करावे हा या स्पर्धेचा उद्देश होता. आजच्या युगात डिजिटल प्लॅटफॉर्म युवांच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा उचलतात. यामध्ये यूट्यूब , फेसबुक, इंस्टाग्राम यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मग याच सोशल प्लॅटफॉर्म चा उपयोग करून जर समाज प्रबोधन केलं तर जास्तीत जास्त युवांची मानसिकता बदलण्यास आपल्याला यश मिळू शकते या विचारांनी हा उपक्रम हाती घेतल्याचे यावेळी दयानंद कुबल यांनी सांगितले. आज शिवजयंती च्या शुभदिनी या स्पर्धेच्या विजेत्यांना दादर येथे सन्मानित करण्यात आले. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित दादर येथील छोटेखानी कार्यक्रमात शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करून सोशल रील स्टार या पुरस्काचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस १११११ रुपये ट्रॉफी आणि सर्टिफिकेट साहिल दळवी याना, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ५५५५, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट पंकज लोखंडे,तर त्रितिय क्रमांकाचे बक्षीस ३३३३ रुपये, ट्रॉफी आणि सर्टिफिकेट गौरी पवार याना देऊन सन्मानित करण्यात आले. तर प्रत्येकी ११११ आणि सर्टिफिकेट देऊन राकेश पवार, साहिल रान्धे, शुभम शेलार, सानिका देवकर याना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
यावेळी कोकण संस्थेच्या साक्षी पोटे, सुरज कदम, प्रीती पांगे, योगिता पवार, श्वेता चोरगे, सुनंदा मोरे, सालिना बुटेलो, सुजित कदम, कोमल कांबळे, सुरज कोयंडे, रोशन राणे, विजया वाळके, बिना अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आयुष याने तुमडी हा शिवकालीन संदेशवहन प्रकार आपल्या कलेतून सादर केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता मर्चंडे यांनी तर प्रास्तविक आणि आभार संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मांडले











