दरवर्षी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे समाजाकरीता योगदान देत असलेल्या पाच व्यक्तींचा गौरव लायन्स सेवा पुरस्कार देऊन करण्यात येतो. एमजेएफ ला डॉ संतोष बेडेकर यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो.या वर्षीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींची निवड जाहीर करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे वितरण दिं २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे आठ वाजता अंबर हॉल येथे मा. प्रांतपाल पीएमजेएफ ला भोजराज नाईक निंबाळकर यांचे शुभ हस्ते करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्ती
श्री भास्कर भिकाजी कुवळेकर
ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून रुग्ण आणि नातेवाईकांची निरलस सेवा
डॉ अक्षय प्रसाद फाटक
सायबर क्राईम विषयी जनतेत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न
श्री वल्लभ वसंत वणजू
अवयव दाना विषयी प्रचार,प्रसार आणि समुपदेशन
श्री प्रदीप सुभाष डिगणकर
गावखडी किनाऱ्यावर कासव संवर्धनासाठी सातत्यपूर्ण कार्य
सौ अनघा दिलीप कांबळे
परिचारिका म्हणून रत्नागिरी
मनोरुग्णालय येथे प्रदीर्घ सेवा
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शूभेच्छा देण्यात येत आहेत.










