नवतरुण विकास मंडळ शेवरे,मुंबई तालुका मंडणगड या मंडळाच्या वतीने विरार येथील हिंदू समाज सभागृह येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आली या शिवजयंती उत्सव निमित्त मंडळाच्या वार्षिक सभेचे ही आयोजन करण्यात आले मंडणगड तालुक्यातील शेवरे गावातील बहुसंख्य चाकरमानी विरार,नाला सोपारा
मुंबई, शहरा तसेच उपनगरात राहत असून नवतरुण विकास मंडळ गावच्या विकास संदर्भात तसेच आपल्या गावातील शहरात आलेल्या चाकरमानी यांची एकजूट राहावी यासाठी प्रत्येक वर्षी वार्षिक सभा तसेच शिवजयंती उत्सव साजरा करत असतात त्याच प्रमाणे यावर्षी ही मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव व वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजसेवक अरुण महाडिक यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले तर दीप प्रज्वलन ज्येष्ठ पत्रकार दीपक महाडिक, निलेश पारदुले,नामदेव गावडे, नारायण शिगवन, सुभाष लोंढे, प्रमोद आग्रे,जयेश धोपट,यांच्या हस्ते
करण्यात आले.अध्यक्ष गौरीशंकर साटम यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले मंडळाचे सेक्रेटरी निलेश महाडिक साहेब यांनी आपल्या भाषणात गावाच्या विकास संदर्भात मार्ग दर्शन करून गावात होणाऱ्या विकास कामा बाबत माहिती करून दिली तर पत्रकार दीपक महाडिक साहेब यांनी शेवरे गाव आदर्श कसे होईल या कडे नवतरुणांनी लक्ष घालण्याची गरज आहे असे आवाहन करून आपली राहिलेल्या आणखी दोन देवळांचे जीर्णोद्धार करणे गरजेचे असल्याचे असे आवाहन केले तर मंडळाचे अध्यक्ष गौरीशंकर साटम साहेब यांनी शिवजयंती उत्सव बाबत मार्गदर्शन केलं व तरुण पिढीने पुढारपण घेऊन मंडळांचे कार्यक्रम मुंबई मध्ये होणे गरजेचं आहे असा उपदेश दिला..
व प्रमोद आग्रे,नीलेश पारदुले,सागर महाडिक, रवींद्र जागडे,नामदेव गावडे,संदीप महाडिक, जयेश धोपट,संतोष सुर्वे,रुपेश घागरूम, यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमा निमित्त मान्यवरांचा,तसेच जय वरदान क्रिकेट संघ या संघाचा ही सत्कार करण्यात आला व्यासपीठावर रामचंद्र शिगवण, महेश घागरूम, संतोष शिगवण, सर्व कमेटी मेंबर सल्लागार इत्यादी मंडळी उपस्थित होती या सभेला शेवरे गावातील सर्व मुंबईकर मंडळीनी उपस्थिती लावली..












