कुवळे येथे किटकनाशक पिऊन आत्महत्या

 

शिरगांव | वार्ताहर : देवगड तालुक्यातील कुवळे तर्फेवाडी येथील विवाहित सुधीर रघुनाथ पवार याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली.ही घटना १९ फेब्रवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबत अधिक वृत असे की, कुवळे तर्फेवाडी येथिल सुधीर पवार यांने सोमवारी सांयकाळी किटकनाशक प्राशन केल्याचे समजताच त्याला तातडीने शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. परंतू उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले. याबाबतची खबर मयताची पत्नी सविता पवार हिने देवगड पोलीस ठाण्यात दिली. शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगांव दूरक्षेत्र अंमलदार महेंद्र महाडीक करीत आहेत.