खडीने भरलेले डंपर न झाकता केली जात आहे वाहतूक,रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडीचे साम्राज्य
लांजा (प्रतिनिधी) दाभोळे वाटूळ मार्गावर मोठ्या प्रमाणात डंपर मधून ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. विशेष बाब यातील अनेक डंपरनआ नंबर प्लेट देखील नाहीत. ही खडी वाहतूक झाकून न करता केली जात आहे आणि यातील आणि बरीचशी खडी रस्त्यावर पडून दुचाकीसारख्या छोट्या वाहनांना अपघातास कारणीभूत ठरत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाकडे दुर्लक्ष होत आहे की डोळे झाक केले जात आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाटूळ दाभोळे या मार्गावरून गेल्या काही दिवसांपासून हा हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे डंपर मधून ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे . ओव्हरलोड वाहतूक करत असताना त्या डंपर मधील खडी रस्त्यावर पडत आहे त्यामुळे मोटरसायकल सारख्या लहान वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. यातील अनेक डंपरना नंबर प्लेट देखील नाहीत. त्याप्रमाणे डंपर मधून खडी वाहतूक करत असताना ती झाकून नेणे आवश्यक असताना ते हा नियम देखील धाब्यावर बसवून खुलेआमपणे ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे.
मात्र याकडे ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष आहे संबंधित प्रशासनाचे.
ईतर वेळी सर्वसामान्य माणसाला कायदा, वाहतूकीचे नियम सांगणार्या संबंधित प्रशासन तसेच आरटीओ अधिकाऱ्यांकडून अशा डंपरवर का कारवाई केली जात नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे हा प्रकार राजरोसपणे सुरू असताना यावर कारवाई का केली जात नाही? की त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे ?असा सवाल येथील भांबेड येथील ग्रामस्थांतून व्यक्त केला जात आहे.










