खेडमध्ये २१३ मिशन बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाई लांबणीवर पडण्याची चिन्हे

खेड(प्रतिनिधी) यंदाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात तालुक्यातील २८ गांवे ८१ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच तालुक्यात पाण्याचा पहिला टँकर धावतो. यंदा मात्र मिशन बंधाऱ्यांसह जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात आलेल्या नळपाणी योजनांमुळे पाणीटंचाई लांबणीवर पडली आहे. यामुळे ग्रामस्थांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे.

पाणीटंचाईच्या आराखड्यात तालुक्याने आजवर नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. पाणीटंचाई ग्रामस्थांच्या पाचवीला पुजल्यासारखी राहिली आहे. पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून प्रयत्न केले जात असले तरी दरवर्षी

सतावणारी पाणीटंचाईची समस्या आजमितीसही कायमच आहे.

यंदा तालुक्यात जलजीवन च्या जलजीवन मिशन कामाचाही अंतर्गत नळपाणी परिणाम, योजनांसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी काहीअंशी मंजूर झाला आहे. . या निधीतून काही ठिकाणी कामे देखील पूर्ण झाली आहेत. यामुळे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध झाल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली आहे.

 

 

तालुक्यात काही ठिकाणी जलजीवन मिशनची कामे दर्जाहीन झाल्याचा सूर ग्रामस्थांकडून आळवला जात आहे. यामुळे त्या त्या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी यंदाही हंबरडा फोडावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतवर्षी ३२ गावातील ५२ वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. यंदा गावांच्या संख्येत घट झाली असली तरी वाड्यांची संख्या वाढल्याने ग्रामस्थ पाणीटंचाईने रडकुंडीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्षानुवर्षे फेब्रुवारी महिन्यातच तालुक्यात पाण्याचा पहिला टँकर धावतो. गतवर्षी १५ फेब्रुवारीला तालुक्यातील पहिला पाण्याचा टँकर पोसरे बुद्रुक – बौद्धवाडी येथून धावला होता. पाणीटंचाईची समस्या काहीअंशी निकाली आणण्याच्या दृष्टीने मिशन बंधारे अंतर्गत पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधण्यावर भर देण्यात आला. यावर्षी जवळपास २१३ बंधारे बांधण्यात आल्याने पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे पाणीटंचाईची समस्या लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

 

मात्र, गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने कहर केल्याने उपलब्ध पाण्याचे जलस्रोत आटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ऐन शिमगोत्सवात ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झाले आहे. टँकरच्या पाण्याची मागणी आल्यास सर्वेक्षणानंतर टँकरने पाणीपुरवठा करण्याची तयारी पंचायत समितीच्या पाणी विभागाने ठेवली आहे.