नाचणे, धनजी नाका येथे बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल 

crime jugar

रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरानजीकच्या नाचणे आणि धनजी नका येथे जुगार खेळ चालवणार्‍या दोघा विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 21 फेब्रुवारी करण्यात आली.

साईराज चंद्रकांत सुर्वे (24,रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल अमोल अरुण भोसले यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी 6.48 वाजण्याच्या सुमारास तो मंगळवार आठवडा बाजार येथील बंद टपरीच्या पाठीमागे बेकायदेशिरपणे कल्याण मटका जुगार खेळ चालवत असाताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचं रात्री पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर धनजी नाका ते जयस्तंभ मार्गावर एका सलूनच्या मागे आडोशाला भाऊ जगन्नाथ फाटक बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवत असाताना पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल भोसले यांना दिसला. त्याच्याकडून 467 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली तर रात्री 8.15 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.