देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा गावात दरवर्षी शिमगोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही हा उत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. याचे औचित्य साधून गावातील तरुणांच्या वतीने “श्री नवलाईदेवी प्रिमियर लिग २०२३” चे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सव कालावधीत चाकरमानी गावात येत असतात. या चाकरमान्यांसह गावातील लहान-थोर मंडळी एकत्र यावी या उद्देशाने सदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या लिगचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत लहान मूलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्व खेळाडू सहभागी होणार आहेत
या स्पर्धा गाव मर्यादित असणार असून त्या रात्रीच्या विद्युत रोषणाईत खेळविल्या जाणार आहेत. स्पर्धेत एकुण आठ संघ सहभागी झाले आहेत. दिनांक १८ मार्च रोजी ही स्पर्धा कुरधुंडा गावातील गुरववाडीतील सहाणे जवळील क्रीडा नगरीत रंगणार आहे.