दारुच्या नशेत आंबा फवारणीचे औषध प्राशन केलेल्या तरवळ-जाकादेवी येथील वृद्धाचे उपचारादरम्यान निधन

रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील तरवळ-जाकादेवी येथे दारुच्या नशेत आंबा फवारणीचे औषध प्राशन केलेल्या वृध्दाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुणालयात मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. सुमारास घडली. भिकाजी गंगाराम कुळ्ये (65,रा. तरवळ-जाकादेवी, रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. भिकाजी कुळ्ये यांनी सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी दारुच्या नशेत आंबा फवारणीचे औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतू, उपचारांदरम्यान त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.