कल्पवृक्ष पर्यटन केंद्रातून निरीक्षण,पर्यटकांसाठी पर्वणी
गुहागर l प्रतिनिधी :सध्या थंडीचा हंगाम सुरू आहे.हाच थंडीचा हंगाम साधून परदेशी पाहुणे “सि गर्ल्स” या पक्षांचे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात येतात. यावर्षीदेखील या परदेशी पाहुण्यांचे गुहागरातील तवसाळ खुर्द समुद्रकिनारी आगमन झाले आहे.
“सि गर्ल्स” हे पक्षी या थंडीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात तवसाळ खुर्द समुद्रकिनारी येतात आणि अनेक दिवसांच्या मुक्कामानंतर ते पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतात.दरवर्षी आपल्या ठरलेल्या कालावधीत हे परदेशी पाहुणे आवर्जून इतक्या दूर समुद्रकिनारी येतात हे एक वैशिष्ट्य आहे.तवसाळ खुर्द जयगड फेरीबोट प्रवासादरम्यान तवसाळ खुर्द समुद्रकिनारी बहुसंख्येने आकाशात विहार करणारे हे सि गर्ल्स पक्षी पाहणे पर्यटक व पक्षीप्रेमींसाठी एक प्रकारची पर्वणी ठरते.
चौकट-
“सि गर्ल्स” हे पक्षी दरवर्षी या थंडीच्या कालावधीत अगदी मोठ्या प्रमाणात तवसाळ खुर्द समुद्रकिनारी येतात आमच्या कल्पवृक्ष कृषी पर्यटन केंद्र तवसाळ खुर्द येथे येणारे असंख्य पक्षीप्रेमी व पर्यटक या पक्षांचे कुतूहलाने निरीक्षण करतात.
– निलेश सुर्वे,कल्पवृक्ष कृषी पर्यटन केंद्र तवसाळ खुर्द












