वेंगुर्ला l प्रतिनिधी : वेंगुर्ला, कॅम्प भटवाडी येथील रहिवासी, ख्यालगिरी येथील स्वामी समर्थ मंदिराचे पुजारी, दशावतारी नाट्यप्रेमी पूजारी वासुदेव यशवंत ताम्हणकर (८०) यांचे २५ फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, मुलगी, जावई, १ भाऊ, पुतणे, पुतणी, सून, नातवंडे असा परिवार आहे.












