वेंगुर्ले l प्रतिनिधी :मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत अणसुर येथे मोफत नेत्र तपासणी आरोग्य शिबीर अणसुर ग्रामपंचायत च्या वतीने आयोजित करण्यात आले, या शिबिरामध्ये ८२ जणांनी लाभ घेतला तसेच २४ जणांनी आयुषमान कार्ड काडून घेण्याचा लाभ घेतला.
सर्व प्रथम या कार्यक्रमाचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सरपंच सत्यविजय गावडे यांच्या हस्ते पुष्प हार घालून करण्यात आले. दिप्रज्वलन आनंद ( बिटू ) गावडे यांच्या हस्ते करून शिबिरामध्ये डॉ, गंद्रे यांची तपासणी साठी आलेली पूर्ण टीम यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तसेच सर्व मान्यवर, ग्रामपंचायत पूर्ण टीम उपस्थितांचे स्वागत करून शिबिराला सुरवात करण्यात आली. या शिबिराला उस्पुर्त प्रतिसाद लाभला तब्बल ८२ जणांनी या शिबिराचा लाभ घेतला, या शिबिरा दरम्यान आयुष्यमान कार्ड चा कॅम्प लावण्यात आला याचा २४ जणांनी लाभ घेतला, या शिबिरात लाभ घेतलेल्या ८२ जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमा सरते शेवटी सरपंच सत्यविजय गावडे यांनी मनोगत व्यक्त करताना, हे शिबीर लावण्याचा उद्देश हा आहे कि सर्व ग्रामस्थाना याचा लाभ घेता यावा, सेवा सुविधा पुरविता याव्यात असाच आहे, वर्षातून दोन ते तीन वेळा आरोग्याच्या दृष्ठीने वेगवेगळी शिबीरे घेत असतो आणि याही फुढे आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवित असताना ग्रामपंचायत च्या माध्यमातून आरोग्यच्या दृष्ठीने म्हणा किंवा अन्य योजनातून म्हणा नवनवीन उपक्रम राबवून ग्रामस्थाना सेवा सुविधा पुरविल्या जातील, याची ग्वाही देऊन या अभियानात ग्रामपंचायत सर्व टीम ग्रामस्थ व माझे सहकारी यांची चांगली साथ लाभत आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमा प्रसंगी उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य, सीमा गावडे, वामन गावडे, सुधाकर गावडे, संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद ( बिटू )गावडे, गणेश गावडे, प्रभाकर गावडे, अंगणवाडी सेविका अनिषा गावडे, मदतनीस अन्नपूर्णा गावडे, आशा सेविका अनुष्का तेंडोलकर, सीआरपी शिला देवूलकर, रुचिता गावडे उपस्थित होते उपस्थित सर्वांचे आभार मानून शिबिराची सांगता करण्यात आली.










