सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथील निलम प्रदिप भालेकर (२५) हिचे रविवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. हल्लीच तिची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. सावंतवाडी वैश्यवाडा येथील महिला उद्योग केंद्र येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होती. तिच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे. सावंतवाडी, गवळीतीठा येथील चंद्रकांत वॉशिंग कंपनीचे मालक प्रदिप चंद्रकांत भालेकर यांची ती मुलगी तर परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर व माजी नगरसेविका दिपाली भालेकर तसेच भालेकर खानावळचे मालक राजू भालेकर यांची ती पुतणी होय. तिच्या आकस्मिक निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.












