खेड(प्रतिनिधी) खेड शहर रोहिदास समाज सेवा संघाच्या वतीने शहरातील समाज कार्यालयात संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित आयोजित नृत्य स्पर्धेत परी कदम हिने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत १९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. श्रुतिका खेडेकर- द्वितीय, रूही खेडेकर-तृतीय तर नंदिनी खेडेकर उत्तेजनार्थ ठरली. परीक्षक म्हणून शितल देवळेकर यांनी काम पाहिले. संगीत खुर्ची स्पर्धेतील लहानगटात सक्षम बुधकर, मयुरेश गुजर, सानिका सावंत, तर मोठ्यागटात रोहन खेडेकर, भक्ती खेडेकर, गणेश खेडेकर यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले.
यावेळी समाजातील सेवानिवृत्त, गुणवंत विद्यार्थी, भारतीय सैन्य दलात निवड झालेले श्रेयांशू खेडेकर, भागेश शिरीषकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खेडेकर, शहराध्यक्ष चंद्रकांत देवळेकर, उपाध्यक्ष राकेश खेडेकर, कार्याध्यक्ष रवींद्र खेडेकर, सल्लागार सुधीर देवळेकर, अनिकेत खेडेकर, खजिनदार अमोल खेडेकर, सचिव सचिन खेडेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन यश खेडेकर, माजी सचिव सचिन गो. खेडेकर यांनी केले.











