आचरा | अर्जुन बापर्डेकर : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने महिला दिनानिमित्त आयोजित होममिनिस्टर स्पर्धेत कै. दिलीप विष्णू सावंत(हुद्देदार) यांच्या स्मरणार्थ श्री. नंदकिशोर ऊर्फ आबा सावंत (हुद्देदार) यांनी प्रायोजित केलेल्या पैठणीच्या मानकरी सौ. प्रणाली कावले तर सोन्याच्या नथीच्या मानकरी सौ. जानकी तावडे ठरल्या.स्पर्धेचा शुभारंभ संस्थेचे उपाध्यक्ष बाबाजी भिसळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला.यावेळी त्यांच्या सोबत संस्थेचे कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, सहकार्यवाह सौ उर्मिला सांबारी,अशोक कांबळी, भिकाजी कदम,सौ दिपाली कावले, अँड सायली आचरेकर,सौ गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरची स्पर्धा ५ फेऱ्यांमध्ये घेण्यात येऊन पहिल्या फेरीपासून अनुक्रमे सौ. उर्मिला सांबारी, सौ.सई राणे (कुलसूम नर्सरी, आचरा ), सौ. स्मिता परब, श्री. निलेश वालकर (सावित्री जेनेरिक मेडिसिन स्टोअर्स, आचरा ) सौ.वैशाली सांबारी, श्रीम. शोभा सुखटणकर, सौ. गीता खेडेकर, सौ. सीमा घुटुकडे, सौ. सुमित्रा गुरव, श्री. यशोधन गवस, सौ. रचना जोशी यांनी बक्षिसे प्रायोजित केलेली होती. तर सर्वच्या सर्व ३२ स्पर्धकांना सौ. नेहा नलावडे, श्रीम. नेहा घाडी,श्रीम. प्रतिभा मयेकर यांनी बक्षिसे प्रायोजित केली. तसेच सर्व स्पर्धकांना व सर्व उपस्थित महिला वर्गाला श्री. रमाकांत आचरेकर यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आकर्षक भेटवस्तू दिली. उपस्थित सर्व महिला वर्गास श्रीम. प्रणया टेमकर सरपंच, आचरा, अँड. सायली आचरेकर, सौ. प्रज्ञा अशेष पेडणेकर (श्री समर्थ काजू उद्योग, आचरा ) यांच्याकडून अल्पोपहार दिला गेला. उपस्थित प्रेक्षकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येऊन त्यांना सौ. मानसी राणे यांजकडून फुलझाडे भेट म्हणून देण्यात आली. अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेचे सूत्रसंचालन सौ.विनिता कांबळी ग्रंथपाल व सौ.मधुरा माणगांवकर यांनी केले.सदर कार्यक्रमास संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर ही स्पर्धा पार पाडण्यासाठी सौ.समृद्धी मेस्त्री, .महेश बापर्डेकर, श्री. स्वप्नील चव्हाण, सौ.कामिनी ढेकणे, सौ.वर्षा सांबारी, कु.वीणा ढेकणे, श्री. रुपेश साटम, सौ.श्रद्धा महाजनी यांनी विशेष परिश्रम घेतले.