बालगोपाळ,पारवाडी वाडी मंडळे नाचातील पैशातून करतात सामाजिक कामे
आचरा | अर्जुन बापर्डेकर :
गोमू चलजावू गो चौपाटी बंदराला
टिमक्याची चोळीबाय रंगान फुलैली
यासारख्या पारंपरिक गीतांबरोबरच आता एकची राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर यासारख्या स्फुरण गीतांच्या सहाय्याने मध्यंतरी दुर्मिळ झालेले गोमूचे खेळ रंगात आले आहेत आणि शिमगोत्सवाची झींग वाढली आहे. यातच या गोमू खेळातून मिळणाया पैशाचा वापर केवळ पार्ट्या झोडण्यासाठी न करता वाडीविकासाच्या विधायक कार्यासाठी करत ही मंडळे आदर्श निर्माण करत आहे.
शिमगोत्सव म्हटला कि खेळ आलेच पण पुर्वी वारेमाप येणारे गोमूचे नाच मधल्या काळात दुर्मिळ बनले होते. बच्चे कंपनीही यापासून दूरच गेल्याचे जाणवू लागले होते.त्यामुळे गोमू नाचासाठी आसूसल्यांना व्हाट्सअप वर येणारया व्हिडिओ वरच समाधान मानावे लागतेकीकाय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण यावर्षी च्या शिमगोत्सवात ती उणीव भरुन काढत छोट्या चमूपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच या नाचगाण्यात रमल्याचे दिसून येत आहेत. देवूळवाडी, पुजारेवाडी येथील बच्चे कंपनी असो की पारवाडी ,बालगोपाळ मंडळाचे कलाकार असो गोमूचे खेळातून यावर्षी ची दुर्मिळ होत असलेले गोमू खेळ सादर करत याहोळीची रंगत वाढवत आहेत *.
*जमणारया पैशाचा विनियोग विकास कामासाठी
आचरा वरचीवाडी येथील बालगोपाळ मंडळ, पारवाडी मंडळाचे युवा वर्गे गोमूचे खेळ काढून मनोरंजनाबरोबरच यामधून मिळणारया पैशातून वाडीतील विकासकामे करत आहेत.विविध पात्रांसोबत गोमूबनलेले युवक सामाजिक जाणिवेतून एकत्र येत आहेत.युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी जेष्ठ ही सहभागी होऊन गोमू खेळाचा उत्साह वाढवित आहेत. याअगोदरही देवूळवाडी घाडी मंडळाकडूनही शिमगोत्सवातील खेळ काढून आपल्या भागातील विकासकामे केली होती. गोमू खेळातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारया यामंडळांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.