मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.!

विविध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार .!

कणकवली : मिळूनी साऱ्याजणी महिला मंचाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय स्पर्धांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

महिला दिनानिमित्त आयोजित पाककला स्पर्धा मध्ये सुमारे 60 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मीना रमाकांत सुतार, द्वितीय क्रमांक मंजिरी वारे, तृतीय क्रमांक विभागून शर्वरी जाधव देवरुखकर, सुमेधा ठाकूर-देसाई, राधिका जावडेकर यांनी पटकावला. या स्पर्धेचे परीक्षण निनाद पारकर त्यांनी केले. चार्मिंग लेडी स्पर्धेमध्ये विजेती प्रियांका जाधव, उपविजेती नेहा गरुड, बेस्ट कॅटवॉक लता पाटील, उत्कृष्ट पोशाख शमिका खंडवी, विशेष बुद्धिमान अन्वी सरूडकर, मिळून साऱ्याजणी चार्मिंग लेडी स्मिता बुटाले तर अर्चना जोशी, संजना ठाकूर, मीनल मर्गज सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षक सुहास वरूणकर तर कोरिओग्राफर संतोष पुजारे होते. आरती राजेश धुरी( उद्योगिनी – आरटीओ ऑथराईज, धुरी ड्रायव्हिंग स्कूलच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव महिला संचालिका), सुषमा दयानंद केणी ( विशेष व्यक्ती – युरेका सायन्स क्लबच्या अध्यक्ष, मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थी दशेतच प्रगल्भ करणाऱ्या, सायन्स चळवळ उभारणारे व्यक्तिमत्व), प्रेरणा सावंत ( अनेक आदर्श विद्यार्थी घडवणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका ), सुहास वरुणकर (बागेश्री थिएटर्स चे संस्थापक, सिंधुदुर्गातील अनेक नाट्य कलाकारांना घडविणारे नाट्यकर्मी), जय भवानी महिला बचत गट (घरोघरी जाऊन मोडच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचा जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर व्यवसाय करणाऱ्या महिलांचा बचत गट), जोगळेकर आई (आम्हा मिळून साऱ्याजणींना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या जेष्ठा) यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात अनेक महिलांनी डान्स, मिमिक्री, कविता वाचन, गायन असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समृद्धी पारकर, शितल पारकर, सेजल पारकर, तेजल लिंग्रज, पूजा परब, सुमेधा काणेकर, भाग्यश्री रासम, संजना साटम, रिमा साटम , प्रीती म्हापसेकर, विना राणे, स्वाती परब, शितल सावंत, अमिता सावंत, शिल्पा सरूडकर, उज्वला काळसेकर, राधिका पालव, सुखदा गांधी, अल्फा पारकर, शुभांगी उबाळे, दिव्या साळगावकर , सुप्रिया सरंगले, मुन्नी बांदेकर, स्वरूपा विखाळे, वैदेही गुडेकर, संजना कोलते, सुप्रिया जाधव, नीता मयेकर, लल्लू पारकर, माधुरी कोदे, परी साळगावकर, रुपाली फाटक यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिया खाडिये-जोगळेकर यांनी केले.