खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील शिरवली- वरचीवाडी येथे बागेतील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केलेल्या. ३५ वयोगटातील तरुणाची अद्याप ओळख पटवण्यात येथील पोलिसांना अपयश आले आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत आढळल्याने ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हानच आहे.
वसंत गुरव यांच्या बागेत अनोळखी तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरल्याने बागेचे मालक वसंत गुरव यांनी कानोसा घेतला असता अनोळखी तरुणाचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला होता. ही बाब पोलिसांना कळवल्यानंतर पंचनामा करण्यात आला. मृतदेह पूर्णपणे कुजल्याने तरुणाची अद्यापही ओळख पटलेली नाही. या बाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख करत आहेत.









