फोंडाघाट | कुमार नाडकर्णी :लोकन्यायालयासारखे उपक्रम गावोगावी व्हावेत.त्यामुळे गावातील भांडण- तंटे आपापसात, सामंजस्याने मिटवून, गावाची एकी आणि सलोखा कायम राहील. त्याचप्रमाणे आपली प्राचीन परंपरा, समृद्ध आणि पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल.पूर्वी गावपंचायतीचे नवे रूप म्हणजेच लोकन्यायालय ! असे मार्गदर्शन कणकवली न्यायालय आणि फोंडा येथील लोकन्यायालयाचे न्यायाधीश श्री शेख यांनी केले. त्यांचे सोबत प .स.विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, वकील मिलिंद सावंत आणि न्यायालय कर्मचारी लोकन्यायालय गाडीसह उपस्थित होते…
फोंडाघाट सरपंच संजना आग्रे आणि उपसरपंच तन्वी मोदी यांनी उपस्थित न्यायाधीश आणि त्यांचे सोबत आलेले सहकारी यांचे स्वागत केले. यावेळी पिंटू पटेल, मधुकर तथा आप्पा सावंत,यशवंत पवार,सचिन सापळे, कानडे गुरुजी, माजी ग्रामसेवक सावंत भाऊ, वंजारेभाऊ, अमित चव्हाण, मिलिंद सावंत तसेच फोंडाघाट ग्रामस्थ यांचे सह लोकन्यायालयातील दाव्यासाठी पक्षकार उपस्थित होते…











