न्हावेली (प्रतिनिधी) :
मळेवाड येथील श्री गजानन महाराज मंदिरात रविवार ३ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यात मोपा गावठणवाडा येथील माऊली एकता कला क्रीडा संस्थेचा ‘ओठी नाम स्वामीचे’ हा भक्ती गीत गायनाचा संगीत कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार दिगंबर गाड यांचे भक्तीगीत गायन होणार आहे. त्यांच्या सोबत गुरुदास गावकर, वेदा मळेवाडकर हे भक्तीगीते सादर करतील. त्यांना तबला साथ राजेश रेडकर, हार्मोनियम आत्माराम रेडकर म्रूदंग, भाग्येश रेडकर हे साथ करतील. कार्यक्रमाचे निवेदन रामनाथ परब आणि ध्वनी संयोजन सुभाष शिरोडकर हे करतील.
या कार्यक्रमानंतर सायंकाळी ७ वाजता श्रींची पालखी मिरवणूक, रात्री ८.३० वाजता महाआरती, रात्री १० वाजता ‘राखणदार’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सत्यवान नाईक गावकर यानी केले आहे.











