रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत पोलियो लसीकरण दिनानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांना खाऊ व पाणी वाटप…

 

वेंगुर्ले l प्रतिनिधी :रोटरी इंटरनॅशनल चा सिंहाचा वाटा असणारा आणि जगभरात यशस्वी झालेला प्रोजेक्ट म्हणजे पोलियो लसीकरण.आज ३ मार्च रोजी पोलियो लसीकरण दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत पोलियो लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाणी व खाऊ ची वाटप करण्यात आले.सोबतच लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग घेत जनजागृती करण्यात आली.

वेंगुर्ला शहरातील पोलियो लसीकरण केंद्रावर भेट देत हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी रोटरी वेंगुर्ला प्रेसिडेंट राजू वजराटकर,असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर,क्लब चे पोलियो डायरेक्टर सदाशिव भेंडवडे,क्लब चे ट्रेजरर पंकज शिरसाट,डॉ वसंतराव पाटोळे,आनंद बोवलेकर आदि रोटरियन उपस्थित होते.