जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात शेफ डे उत्साहात साजरा

सावंतवाडी । प्रतिनिधी : इंटरनॅशनल शेफ डे’ संपूर्ण जगभरातील लोकांना निरोगी व पौष्टिक खाण्याबद्दल जनजागृती करण्यासाठी व अनुभवी शेफ यांचे ज्ञान आणि स्वयंपाक कौशल्य अभिमानाच्या भावनेने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी साजरा केला जातो.

याच दिवसाचे औचित्य साधून जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स, साळगाव येथे जे.सी.एस शेफ कॉम स्पर्धेचे आयोजन गुरुवार २० ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ‘Flame Kings’ या संघाने विजेता तर ‘Captain cook’ या संघाने उपविजेता पदावर शिक्का मोर्तब केले.

गोवा शेफ कॉम विजेते व सिंधुदुर्गातील नामांकित हॉटेल व्यवसायिक शेफ प्रशांत कासार यांनी स्पर्धेचे परीक्षण व मुलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला लोकमान्य एज्युकेशन विभागाचे सीनियर एक्झिक्यूट श्री. प्रवीण प्रभूकेळुसकर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

“रेस्टोरंट” या शब्दाचा उगम “restoratives” म्हणजेच तब्येत ठीक करणारा, अशा आशयाचा आहे. परंतु सध्य परिस्थिती पाहता हॉटेलचे जेवण तब्येतीस घातक असते, असा लोकांचा समज वाढत चालला आहे. याचे मूळ कारण हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री नसलेले अकुशल आचारी आणि प्रचलित होत चाललेल्या व तब्येतीस घातक ठरणाऱ्या पाककृत्या.

ही परिस्थिती एक शेफच बदलू शकतो. येणाऱ्या काळात जगभरात शेफ या व्यवसायाला व हॉटेल मॅनेजमेंट पदवीला प्रचंड मागणी वाढणार आहे, त्यामुळे मुलांनी आता परिश्रम घेतले आणि ही कला आत्मसात केली तर येणारा काळ त्यांच्या साठी सुवर्ण ठरणार आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी देशभक्त गवाणकर कॉलेज, सावंतवाडी चे प्राचार्य यशोधन गवस, अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य सच्चिदानंद कनयाळकर, जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स चे प्राचार्य अमेय महाजन, शेफ टॅरी देसा या सर्वानी शेफ डे च्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Sindhudurg