सातार्डा I प्रतिनिधी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेतर्फे २३ ऑक्टोंबर रोजी नरकासूर व आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या शुभहस्ते तर युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या नरकासुर स्पर्धेसाठी नरकासुराची उंची कमीत कमी आठ फूट असावी. तर आकाश कंदील हा पर्यावरण पूरक असावा. नरकासुर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ३ हजार रुपये, तृतीय क्रमांक १५०० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर आकाश कंदील स्पर्धा प्रथम क्रमांक १५०० रुपये, द्वितीय क्रमांक १ हजार रुपये व तृतीय क्रमांक ५०० रुपये तसेच दोन्ही स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
Sindhudurg