खेड(प्रतिनिधी) खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे विद्यमान अध्यक्ष व संस्थापक सदस्य, महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून उत्तम व यशस्वीरित्या सेवा पूर्ण करणारे कार्यतत्पर व आदर्श व्यक्तिमत्व मंदार गंगाराम हळदे हे स्वेच्छानिवृत्ती घेऊन नुकतेच सेवानिवृत्त झाले, त्याबद्दल खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश तांबे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाला निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक दशरथ महाडिक, महेंद्र सावंत, खेड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दिपक गोरे, त्रैलोक्य बौद्धमहासभेचे धम्मचारी शुभ्रकेतू, धम्मचारी प्रशिल, धम्माचारीणी यशोदिपा, खेड पंचायत समिती माजी सदस्य गणेश मोरे, शांताराम हळदे, दिपक हळदे, संदिप तांबे, कोकण विभागीय युवक आर पी आय चे कोकण प्रदेश अध्यक्ष सुशांत सकपाळ, सचिव सुरेंद्र तांबे , प्रवर्तक सेवा संस्थेचे अध्यक्ष सखाराम मोहिते, अजित जाधव, अनंत हळदे, विठ्ठल गमरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मंदार हळदे यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश तांबे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक कांबळे, प्रास्ताविक चंद्रकांत कांबळे व आभार विनोद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी सभासदांचे योगदान लाभले.











