निलेश राणे यांच्या पुढाकारातून मठ भोगलेवाडी रस्त्याची दुरुस्ती

 

गैरसोय दूर झाल्याने ग्रामस्थानी मानले आभार 

अमित खोत | मालवण : तालुक्यातील आडारी बेळणे या मुख्य मार्गाला लागून असलेल्या मठ भोगलेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होत होती. हा रस्ता तातडीने सुस्थितीत व्हावा. या ग्रामस्थांच्या मागणीनुसार भाजपाचे कुडाळ मालवण विधामसभा प्रमुख निलेश राणे यांच्या पुढाकारातून तात्पुरत्या स्वरूपात या रस्त्याचे काम करून हा रस्ता सुरू करण्यात आला आहे.

 

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्यामुळे मठ भोगलेवाडीतील ग्रामस्थांना शॉर्टकट जाता येणार आहे. रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थानी समाधान व्यक्त करत निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. यावेळी ग्रा. पं. सदस्य संतोष पालव, कांता भोगले, मोहन भोगले, विलास भोगले, धनेश भोगले, अजित भोगले, रोशन भोगले, राजू भोगले, बाबू भोगले, चंद्रकांत भोगले, पप्पू भोगले, बाबुराव भोगले, तातू भोगले, दीपक राणे, सुरेश राणे, रॉबी फर्नांडीस, संजय सनम, निलेश खोत यांच्यासह अन्य ग्रामस्थ आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.