तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करताना आयोजित करण्यात आले विविध कार्यक्रम
लांजा | प्रतिनिधी : शहरातील कुंभारवाडी येथील श्री हरभट मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती सोहळा शुक्रवारी १० मार्च रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कुंभारवाडी येथील पंढरी मायशेट्ये यांच्या निवासस्थानी दरवर्षी श्री हरभट मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती सोहळा हा तिथीप्रमाणे साजरा करण्यात येतो. शुक्रवारी देखील हा शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन तसेच मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. यानिमित्ताने शिव जन्मावर पाळणा सादर करण्यात आला .दुपारी एक ते तीन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी चैतन्य सांप्रदाय भजन मंडळ कुंभारवाडी यांचे भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या सर्व कार्यक्रमांमध्ये हरभट मित्र मंडळ कुंभारवाडी चे सर्व पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.हा शिवजयंती सोहळा उस्फूर्तपणे असं साजरा करण्यात आला. सर्व ग्रामस्थांनी शिवछत्रपती शिवरायांचे दर्शन घेत त्यांच्या चरणी नतमस्तक झाले.