पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला शुभारंभ
सिंधुनगरी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊ हजार बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वाटप करण्यात येत आहे. या वितरणाचा शुभारंभ शुक्रवारी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. जिल्ह्यात उद्या शनिवारपासून जिल्ह्यात पाच ठिकाणी याचे वितरण होत आहे. नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग चे सहाय्यक कामगार आयुक्त संदेश सु. आयरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदीत (जिवीत) सक्रिय बांधकाम कामगारांकरीता सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना, आर्थिक योजना, आरोग्य योजना अशा प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. नोंदीत (जिवीत) सक्रिय बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तू संच वाटप या योजनेचे मा.श्री. रविंद्रजी चव्हाण, पालकमंत्री, सिंधुदुर्ग व मा.श्री. किशोरजी तावडे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या हस्ते आज दिनांक ०८/०३/२०२४ वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी प्रधानमंत्री विश्वकर्मा समितीचे सदस्य, मा. श्री. प्रभाकर सावंत, माजी आमदार मा. श्री. राजनजी तेली, मा. निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग श्री. मच्छिंद्रजी सुकटे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सदर योजनेचा सुमारे ९००० बांधकाम कामगारांना लाभ मिळणार आहे. उद्या दिनांक ०९/०३/२०२४ पासुन जिल्ह्यातील पुढील पाच ठिकाण १) काझी शाहुउद्दीन हॉल, नगपरिषद सावंतवाडी २) मामा वरेरकर हॉल, नगरपरिषद मालवण ३) कुडाळ पंचायत समिती हॉल, कुडाळ ४) कणकवली नगरपंचायत हॉल, कणकवली ५) देवगड तालुका खरेदी विक्री संघ, पेट्रोलपंप नजीक मुकुंद फाटक सभागृह, देवगड गृह उपयोगी वस्तू संच वाटपाचे कामकाज सुरू करण्यात येत आहे. सदरचे गृह उपयोगी वस्तू संच हे विनामुल्य देण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याती नोदीनत जिवीत बांधकाम कामगारांना सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. संदेश सु. आयरे, सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरी/ सिंधुदुर्ग यांनी केले आहे. दिनांक १०/०३/२०२४ रोजी मामा वरेरकर हॉल, नगरपरिषद मालवण येथे कॅम्प होणार नसून दिनांक ११/०३/२०२४ पासून पुढे वाटप सुरू राहील; याची सर्व कामगारांनी नोंद घ्यावी.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार विभागाचे ओळखपत्र हमीपत्र नूतनीकरण ऑनलाईन जीवित पावती आधार कार्ड व रेशन कार्ड याच्या झेरॉक्स प्रति सोबत आणणे आवश्यक आहे असेही या विभागाकडून कळविण्यात आले आहे











