कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी ५ हजार ४५० कोटी : ना. रविंद्र चव्हाण

कनकसिंधू शासकीय विश्रामगृहाचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आ.नितेश राणे यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण

कणकवली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस व त्याचबरोबर कोकणचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये कोकण आणि कोकणामधील पर्यटनाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली पाहिजे तर इथे असणारी दळणवळणाची साधने सुदृढ झाली पाहिजे. खऱ्या अर्थाने इथले रस्ते सुस्थितीत झाले पाहिजेत. या दृष्टीकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी मिळाली तेव्हापासून, कोकण म्हणजे रत्नागिरी – सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यात ५४५० कोटी चा निधी देण्याचे काम मी केले आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.कणकवली येथील “कनक सिंधू’ अर्थातच कणकवली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलत होते.

 

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते कणकवली येथील रेस्ट हाऊसचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजी आ. प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, सावंतवाडी कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, उपअभियंता विनायक जोशी, कमलीनी प्रभू आदी उपस्थित होते.

 

ते पुढे म्हणाले,संपूर्ण कोकणचे सौंदर्य बदलण्याचे काम या माध्यमातून झालेल आहे. अतिशय वेगवेगळ्या हेडमध्ये ही काम करण्याचं काम केलेलं आहे. कणकवलीचे हे रेस्ट हाऊसच काम अतिशय चांगल्या पद्धतीचं करण्यात आल आहे. त्याचबरोबर मालवण सह इतर ठिकाणी असणारे रेस्ट हाऊस सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. रेस्ट हाऊस वर जाणारा प्रत्येक जण त्याची प्रशंसा करेल असं काम झालं आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांन देखील नव्या पर्वामध्ये प्रवेश केलेला आहे. पारदर्शक आणि जलद गतीने काम हे उद्दिष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने समोर ठेवले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र शासन एक वेगळ्या पद्धतीने केंद्र आणि राज्याचे डबल इंजिनचे सरकार आहे. हे सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असणारा विकास… विकसित भारत निर्माण करण्यासाठी कोकणाने सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने पाऊल उचलले आहे, असे पालकमंत्री श्री चव्हाण यांनी सांगितले.

 

यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांनी संपूर्ण नूतन शासकीय विश्रामगृहाची पाहणी केली. यावेळी व्हीव्हीआयपी सूट आणि अंतर्गत सोयीसुविधा याबद्दल कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ. नितेश राणे यांनी कौतुक केले.