सनगरे राष्ट्रीय परिषदेत संशोधनाचे सादरीकरण येथील गोगटे जोगळेकर महाविद्यायातील समाजशास्त्र विभागातील
प्राध्यापक सचिन सनगरे यांनी राष्ट्रीय परिषदेत स्वयंपूर्ण ग्राम विकासासासाठी
महिलांची भूमिका या अनुषंगाने आपल्या संसोधानाचे संशोधनाचे सादरीकरण
केले. प्राचीन काळापासून महिलांचे विकास प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असून त्यांच्या
सकारात्मक कृतीशील सहभागाशिवाय गाव स्वयंपूर्ण व समृद्ध होणार नाहीत.
महिलांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण व प्रशिक्षण
दृष्टीकोनातून महिलांचे मानसिक, आर्थिक उत्पादक श्रम, कौशल्य संदर्भात प्रत्यक्ष
माहिती संकलनावर आधारित संशोधन त्यांनी केले होते.
प्रत्यक्ष लाभाच्या शासकीय योजना यशस्वी पणे राबविल्या गेल्यास महिला
सक्षम होतील. महिलांच्या मदतीनेच गावांचा विकास शक्य आहे असे मत त्यांनी
मांडले. उर्जा, संसाधने , सहकार्य , सहभाग व संघटन यातून शाश्वत विकासाकडे
जाण्याची महिलांची भूमिका महत्वाची आहे असा निष्कर्ष त्यांनी आपल्या
संशोधनातून सदर केला . गोगटे जोगळेकर हविद्यालय व कीर विधी महाविद्यालय
यांच्या संयुक्त विद्यमाने , बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने या राष्ट्रीय परिषदेचे
आयोजन करण्यात आले होते.
शैक्षणिक पातळीवर कार्यरत प्रा. सचिन सनगरे यांचे सामाजिक कार्य देखील
उल्लेखनीय आहे. सामाजिक विषयावरील ४०० पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध केले
असून त्यांनी विविध विद्यापीठासाठी ७२ अभ्यास घटकांचे लेखन केले आहे. कथा,
कविता , पथनाट्य , एकांकिका, संशोधन अहवाल लेखन , शासकीय कर्मचारी
प्रशिक्षक , सर्व सामान्यांना शासकीय योजनेचा लाभ, शासनाच्या मासिकांसाठी
लेखन , जालायुक्त शिवार , महिला बचतगट , सर्वेक्षण आदी विविध क्षेत्रात कार्यरत
प्रा. सनगरे यांच्या स्वयंपूर्ण ग्राम प्रतिमान अभ्यास व संशोधन सादरीकरणाबद्दल
सर्व प्राध्यापक सहकारी व पत्रकार मित्र परिवार यांनी विशेष कौतुक केले आहे.
कोकणातील गावे सक्षम व स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी त्यांनी सदर विषयाचा अधिक
अभ्यास करावा यासाठी शुभेच्छा दिल्या.











