दिव्यांग कार्ड अमान्य, वाहकास धरले धारेवर

 

 

खेड (प्रतिनिधी)खेड बसस्थानकातून सुटलेली आपेडे- खेड बसफेरी परतीला येत असताना एका दिव्यांग प्रवाशाकडील ५० टक्के सवलतीचे दिव्यांग कार्ड वाहकाने नाकारत पूर्ण तिकीट काढण्याचा प्रकार उघडकीस आला . ही बाब कॉंग्रेस पर्यावरण जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांना समजताच बसस्थानक गाठत व्यवस्थापकांसह वाहकास धारेवर धरले.

 

 

खेड बसस्थानकातून सकाळी १० वाजता सुटणाऱ्या खेड-आपेडे बसफेरीच्या परतीच्या प्रवासात आपेडेतील एक दिव्यांग प्रवाशाने खेडकडे येताना वाहकाकडे दिव्यांग कार्ड देऊन ५० टक्के तिकीट

सवलतीची मागणी केली. मात्र वाहकाने दिव्यांग ओळखपत्र बनावट असल्याचे कारण पुढे करत पूर्ण तिकीट घेण्याचे फर्मान सोडले. मात्र दिव्यांग प्रवाशाने ओळखपत्राचा वापर करत असल्याचे सांगून देखील वाहकाने ते अमान्य करून त्यांना भरणे येथे उतरण्यास भाग पडले. मात्र त्यांनी बसमध्ये चढून पूर्ण तिकीट काढले. यावेळी मात्र वाहकाने पूर्ण तिकीट देण्याऐवजी दिव्यांग तिकीट दिले. ही बाब त्या प्रवाशाने काँग्रेस पर्यावरणचे जिल्हाध्यक्ष किरण तायडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी बसस्थानकप्रमुख पाटील पाटील यांच्यापुढे वस्तूस्थिती मांडून जाब विचारला. वाहकांना सूचित करणार असल्याचे सांगत असा प्रकार पुन्हा घडणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले