शाखा वर्ग करण्याचा झाला होता निर्णय : मात्र त्या निर्णयास बँकेची स्थगिती
अमित खोत | मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा बँक हिवाळे शाखा काही तांत्रिक कारणामुळे बंद करून विरण शाखा येथे वर्ग करण्याचा निर्णय झाला. मात्र लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या आग्रही मागण्यांचा विचार करून भाजप नेते माजी खासदार निलेश राणे, बँक अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या सहकार्यातून हिवाळे बँक शाखा वर्ग न करण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत खातेदार, शेतकरी, ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हिवाळे ग्रामपचायत मध्ये हिवाळे व ओवळीये या दोन्ही गावातील सरपंच उपसरपंच सदस्य व सर्व खातेदार यांची बैठक झाली होती. या बैठकीला जिल्हा बँक अधिकारीही उपस्थित होते. हिवाळे बँक शाखा वर्ग न होण्यासाठी माजी खासदार निलेश राणे, बँक अध्यक्ष मनिष दळवी, संचालक बाबा परब यांची भेट घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे सरपंच हिवाळे रघुनाथ धुरी, समानता ग्राम विकास समिती आणि माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी निलेश राणे व बँक अध्यक्ष, संचालक यांची भेट घेतली. त्यावेळी निलेश राणे व सर्वांनी बँक स्थंलारीत न होण्याचे आवाश्वस दिले होते. त्याप्रमाणे बँकेने पत्र संबंधीत शाखेला दिले. त्याबद्दल दोन्ही गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार व समाधान व्यक्त होत आहे.












