बांदा शहरात कॅश्यू दुकान फोडून रोकड व काजूगर लंपास

 

बांदा : प्रवीण परब

बांदा कट्टा कॉर्नर येथील एसटी स्टँड मार्गावरील मांगिरीश कॅश्यू अँड ड्राय फ्रुट्स हे दुकान मध्यरात्री अज्ञात चोरट्याने फोडले. यात सुमारे ३ हजार रुपये रोकडसह सुमारे १० हजार रुपयांचे काजूगर अज्ञात चोरट्याने लंपास केले. चोरट्याने कटावणीच्या साह्याने शटर तोडून हात प्रवेश केला.

 

आज सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत प्रोप्रा. चिन्मय प्रेमानंद नाडकर्णी यांनी बांदा पोलिसांना कळविले. भरवस्तीतील व गजबजलेल्या मार्गावरील या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अद्याप पंचनामा केलेला नसल्याने चोरीचा नेमका आकडा प्राप्त झालेला नाही. घटनास्थळी मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली.