आबलोली :महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अहमदनगरच्या वतीने यावर्षी साहित्य पुरस्काराची घोषणा साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष किशोर मरकड व कार्याध्यक्ष डॉ.चंद्रकांत जोशी यांनी केली.
सुमारे ३०० साहित्यकृती या स्पर्धेत होत्या. त्यातून कादंबरी प्रथम पुरस्कार
बाळासाहेब लबडे- गुहागर यांच्या अथर्व पब्लिकेशन जळगाव प्रकाशित “शेवटची लाओग्राफिया” या कादंबरीस जाहीर झाला आहे.या कादंबरीचा पृथगात्म विषय व मांडणी असलेली कादंबरी मराठीमध्ये मी प्रथमच वाचली, असे उद्गार पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी काढले.लोक कथांचा समाज मनावर प्रभाव असतो.समाज मनात त्या खोलवर रूजलेल्या असतात.त्या सुगम असतात. प्रत्येक लोककथा काहीएक तत्वज्ञान मांडत असते.’ शेवटची लाओग्राफिया ‘ मध्ये लोककथा येतात.त्या जिवनाची विसंगती विविध अंगाने टिपतात.अशी समीक्षा पद्मश्री नामदेव कांबळे यांनी केली आहे.
सदर पुरस्कार वितरण समारंभ एप्रिलच्या महिन्यात होणार असून पुरस्कार मिळालेले डाॅ.लबडे यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचे प्रमुख कार्यवाह शिल्पा रसाळ, सहकार्यवाह डॉ. श्याम शिंदे, उपाध्यक्ष दशरथ खोसे, शिरीष मोडक,ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर , खजिनदार डॉ. शितल म्हस्के, राजेंद्र उदागे व सर्व कार्यकारी सदस्यांनी अभिनंदन केले आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.












